खानापूर : पतीने पत्नीच्या डोकीत लोखंडी रॉडने घाव घालून खून केल्याची घटना शांतीनगर, वास्को ( गोवा) येथे घडली आहे.
वैशाली चाळोबा केसरकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. चाळोबा याने लोखंडी रॉडने पत्नी वैशाली हिच्या डोकीत वार केला. रॉडच्या फटक्याने वैशाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित झाली.
वास्को पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याप्रकरणी आरोपी चाळोबा केसरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चाळोबाने पत्नीचा खात्मा का केला याची माहिती घेण्यात येत आहे.
आरोपी चाळोबा हा खानापूर तालुक्यातील बेकवाड गावचा रहिवाशी असून शांतीनगर, वास्को ( गोवा) येथे उदरनिर्वाहासाठी पत्नी वैशाली सोबत राहात होता असे समजते.