जायन्ट्स परिवारने केली तंबाखू विरोधात जनजागृती

Ravindra Jadhav
जायन्ट्स परिवारने केली तंबाखू विरोधात जनजागृती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारने आज जागतिक तंबाखू विरोधी दिनी तंबाखूचे सेवन न करण्याबद्दल जनजागृती केली.
देशमुख रोड टिळकवाडी येथील चव्हाण डेअरी येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम झाला. यानंतर शहरात तंबाखू विरोधात जनजागृती करण्यात आली.

उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजाराची आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी फेडरेशनचे अध्यक्ष राजू माळवदे यांनी केले.
या कार्यक्रमाला जायन्ट्सचे सदस्य दीपक हवाळ, प्रवीण त्रिवेदी, एम गंगाधर, प्रशांत सुगंधी, चव्हाण डेअरीचे संचालक आदित्य गेंजी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article