मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे करण्यात आले होते’ एक्स सर्व्हिसमन रॅली ‘चे आयोजन

Ravindra Jadhav
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे करण्यात आले होते’ एक्स सर्व्हिसमन रॅली ‘चे आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘ एक्स सर्व्हिसमन रॅली ‘चे आयोजन करण्यात आले होते.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सेवानिवृत्त सैनिकांनी या रॅलीमध्ये हजेरी लावली होती.

पेन्शन, बँक, महसूल खाते यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण या एक्स सर्व्हिसमन रॅलीमध्ये करण्यात आले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या रॅली च्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी भूषवले होते.
शिवाजी स्टेडियमवर रेकॉर्डस विभाग, पोस्ट, बँक, विमा आदी वेगवेगळे स्टॉल उभारण्यात आले होते. भारतीय सैन्यातील अन्य रेजिमेंटचे देखील कर्मचारी सेवानिवृत्त सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित होते. महसूल आणि पोलीस खात्याचे अधिकारी देखील सेवानिवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित होते.पंधराशेहून अधिक सेवानिवृत्त सैनिक,तीस वीर नारी आणि अपंगत्व आलेल्या पाच सैनिकांनी एक्स सर्व्हिसमन रॅली मध्ये सहभाग नोंदवून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी वीर नारींचा भेटवस्तू देऊन गौरव केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article