बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) : जिल्हा बांधकाम कामगार संघटना व मजदूर नवनिर्माण संघाच्या प्रयत्नांना यश येऊन 6 ते 7 वर्षापासून कामगार कल्याण मंडळाच्या लालफितीत अडकलेले कामगारांच्या लग्नाचे व मॕटर्निटी सहाय्यधनाचे बाँड बाहेर आले.
जिल्हा बांधकाम कामगार संघटना व मजदूर नवनिर्माण संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगांवच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील लाभार्थी बांधकाम कामगारांना घेऊन आपल्या समस्यांबद्दल आंदोलन करताना भरपूर वेळा निवेदने दिलेली होती.
संघटनेमार्फत केलेल्या या सातत्यपूर्वक प्रयत्नांना आता यश आलेले असून, मागील 6 ते 7 वर्षापासून सरकार दरबारी लालफितीत अडकलेले लग्नाच्या सहाय्यधनाचे बाँड व मॕटर्निटी सहाय्यधनाचे बाँड तयार झालेले असून, त्याची यादी बेळगांव जिल्हा कामगार कचेरीतर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी बेळगांव जिल्हा कामगार खात्याचे उपायुक्त म्हणून रूजू झालेल्या अमरेंद्र यांनी बेळगांवच्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचे ठरविले व महिन्याभरात मागील बाँड मंजूर केले. मजदूर नवनिर्मान संघ व जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश येऊन कित्येक कामगारांच्या विवाहाच्या सहाय्यधनाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. तसेच आता गेल्या 6 ते 7 वर्षापासून बाकी राहिलेल्या विवाह सहाय्यधनाचे बाँड आणि मॕटर्निटी सहाय्यधनाचे बाँड बेळगांव जिल्हा कामगार कार्यालयात उपलब्ध झाले आहेत.
लाभार्थी कामगारांनी दिनांक 20/08/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या योग्य कागदपत्रासह (लेबर कार्ड, आधार कार्ड व बँक पासबूक) येऊन आपापले बाँड घेऊन जाणे असे राहुल पाटील यांनी संघटनेच्यावतीने कळविले आहे.
अंदाजे 212 विवाह सहाय्यधनाचे बाँड आणि 49 मॕटर्निटी सहाय्यधनाचे बाँड तयार आहेत.
कामगार खात्याने जाहीर केलेल्या वरील यादीत ज्या बांधकाम कामगारांचे नाव आहे, त्यांनी आपापली नावे तपासून घ्यावी. आणि दिनांक 20/8/24 दुपारी ठीक 4 वाजता बेळगांव जिल्हा कामगार कचेरीत यावे व येताना कामगार कार्ड संदर्भातली आपली (लेबर कार्ड, आधार कार्ड व बँक पासबूक) योग्य कागदपत्रे घेऊन यावेय, असेही सांगण्यात आले आहे.