श्री नामदेव दैवकी संस्थेची नव्या समाज भवन वास्तूसाठी जागेची मागणी : जिल्हा पालकमंत्र्यांसह महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांना दिले निवेदन

Ravindra Jadhav
श्री नामदेव दैवकी संस्थेची नव्या समाज भवन वास्तूसाठी जागेची मागणी : जिल्हा पालकमंत्र्यांसह महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांना दिले निवेदन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्थेला नव्या समाज भवन वास्तू बांधणीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खडेबाजार, बेळगाव येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.

कुवेंपू नगर, बेळगाव येथील सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी जाऊन नामदेव दैवकी संस्थेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार आणि राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्ष अजित कोकणे , उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, संचालक दिपक खटावकर सुरेश पिसे, अशोक रेळेकर, भाऊ मुसळे, कार्यकर्ते राजन काकडे, नागेश हावळ, महेश खटावकर, मनोज पतंगे ,उमेश पिसे , राजू माळवदे ,उज्वल बोंगाळे, पुंडलिक वंडकर, भरत चिकोर्डे, प्रवीण काकडे, प्रशांत मुसळे, कृष्णा चिकोर्डे, आनंद बुलबुले, प्रवीण महेंद्रकर, प्रवीण काळभैरव, अभिषेक हावळ, सुहास खटावकर, पंढरी पिसे, देवेंद्र हावळ, राजेश पतंगे, महादेव पाटुकले , महिला प्रतिनिधी विना हावळ यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article