क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्दी योजनेकडून वात्सल्य घर मंजूर : भूमिपूजन करून केला गेला घर उभारणीचा शुभारंभ

Ravindra Jadhav
क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्दी योजनेकडून वात्सल्य घर मंजूर : भूमिपूजन करून केला गेला घर उभारणीचा शुभारंभ
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव, दिनांक 20 ( प्रतिनिधी) : येळळूर कार्यक्षेत्रात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्दी योजने कडून श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले (लक्ष्मी गल्ली, येळळूर) यांना वात्सल्य घर मंजूर झाले.

त्या जागेचा भूमिपूजन समारंभपूर्वक करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आणि संघाचे बेळगांव जिल्हा जनजागृती सदस्य दुदाप्पा बागेवाडी होते.
याप्रसंगी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्दी संघाचे बेळगांव जिल्हा संचालक सतीश नाईक, योजना अधिकारी ज्योती जोळ्ळद, बेळगांव जिल्हा जनजागृती सदस्य दुदाप्पा बागेवाडी, सहदेव, ग्रामपंचायत सदस्य जोतिबा चौगुले, लक्ष्मी येळळूरकर, आणि नवजीवन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी शिल्पा यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर सतीश नाईक यांनी संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली.
दुदाप्पा बागेवाडी यांनी यावेळी बोलताना, डॉ. विरेंद्र हेगडे व माई हेमावती हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येळळूर गावामध्ये महिलांसाठी अनेक योजना आणल्या व मंदीर आणि शाळेसाठी अर्थसहाय्य केले, व्यसनमुक्ती शिबिरे भरविली, असे सांगत श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्दी संघाच्या लोकहितवादी कार्याची प्रशंसा केली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी भूमिपूजन केल्यानंतर सतीश नाईक, दुदाप्पा बागेवाडी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून वात्सल्य घर उभारणीला सुरुवात करण्यात आली.
योजना अधिकारी ज्योती जोळ्ळद यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article