पुणे येथे होणार दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21 वे अधिवेशन आणि दहावे साहित्य संमेलन

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : देशभर सर्वत्र विखुरलेल्या दैवज्ञ समाजातील ज्ञाती बांधवांचे अखिल भारतीय पातळीवरील दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे 21 वे अधिवेशन आणि दहावे साहित्य संमेलन 19 ते 22 डिसेंबर असे चार दिवस ‘गणेश कला क्रीडा रंगमंच’ शुक्रवार पेठ, पुणे येथे संपन्न होत आहे. या परिषदेचे आयोजन श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने होत आहे.

देशभरातून समाजबांधव उपस्थित राहत असून बेळगाव मधून पन्नास हून अधिक जण या परिषदेत भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत .त्यामध्ये सुवर्णकार व्यावसायिक संघ शहापूर , दैवज्ञ ब्राह्मण संघ,दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्था, सुवर्ण लक्ष्मी को-ऑप. सोसायटी, दैवज्ञ सांस्कृतिक भवन निर्माण समिती आणि महिला मंडळ अशा विविध संस्थांच्या प्रतिनिधिंचा समावेश आहे.

19 डिसेंबर रोजी सायंकाळी शोभायात्रा होणार असून 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारताचे नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. त्या दिवशी दुपारी होणाऱ्या ” समाजकार्यातील ज्ञातीचे योगदान” या विषयावरील पहिल्या सत्राचे उद्घाटन बेळगावचे ज्येष्ठ व्यावसायिक आणि सांस्कृतिक भवन निर्माण समितीचे अध्यक्ष मारुतीराव सांबरेकर यांच्या हस्ते होणार आहे .

21 डिसेंबर रोजी महिलांसाठी विविध कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी सायंकाळी तीन वाजता दैवज्ञ साहित्य संमेलन भरणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर हे करणार आहेत. 22 डिसेंबर रोजी सकाळच्या दोन सत्रानंतर सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारखी, स्वागताध्यक्ष अजय कारेकर, संजय चाचड व मुळचे बेळगावचे असलेले रत्नाकर काकतीकर यांच्या प्रयत्नातून हे अधिवेशन यशस्वी होत आहे.
या कार्यक्रमाला बेळगावमधून विठ्ठलराव शिरोडकर , मोहनराव कारेकर ,राजू बांदिवडेकर, दत्तात्रय कारेकर , विशाल शिरोडकर, हेमंत मुतकेकर, प्रदीप अर्कसाली यांच्यासह अनेक समाज बांधव सहभागी होत आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article