ती घटना प्रेमप्रकरणातून ……!

Ravindra Jadhav
ती घटना प्रेमप्रकरणातून ……!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : प्रणितकुमार या 31 वर्षीय तरुणावरील गोळीबार हा प्रेम प्रकारणातून झाल्याचे उघड झाले आहे. 
द्वारकानगर टिळकवाडी येथील प्रणितकुमार याच्यावर बुधवारी रात्री महांतेशनगर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारात प्रणितकुमार जखमी झाला होता. त्याच्यावर येथील बीम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत.
प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असून यासंदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
प्रेम प्रकरणामुळे उद्भवलेल्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी प्रणितकुमार हा व अन्य कांही जण महांतेशनगर येथे जमले होते. त्यावेळी चर्चेचे पर्यवसान वादात झाले आणि मुलीकडील संतापलेल्या लोकांनी प्रणितकुमारवर गोळ्या झाडल्या. गोळी प्रणितकुमारच्या पायाला लागली. जखमी प्रणितकुमारवर बीम्स मध्ये उपचार सुरू आहेत असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article