Ad imageAd image

दहावीत जिल्ह्यात पहिली आलेल्या तनिष्का नावगेकरचा आदर्श को ऑप. सोसायटीतर्फे सत्कार

Ravindra Jadhav
दहावीत जिल्ह्यात पहिली आलेल्या तनिष्का नावगेकरचा आदर्श को ऑप. सोसायटीतर्फे सत्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा अनगोळ क्रॉस टिळकवाडी येथील आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन एस. एम. जाधव होते.

तनिष्का हिने दहावीच्या परिक्षेत 625 पैकी 620 ( 99.20 टक्के ) गुण मिळविले आहेत. जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवून तिने बेळगाव शहराचा नावलौकिक वाढविला आहे. या यशाबद्दल तिचा चेअरमन एस. एम.जाधव व व्हाईस चेअरमन एन. वाय. कंग्राळकर यांच्या हस्ते रोख पाच हजार रुपये व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना एस. एम. जाधव यांनी प्रत्येक परिक्षेत मुली बाजी मारतात हे कौतुकास्पद आहे, असे सांगून तनिष्काचे अभिनंदन केले व तिला उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक ए. एल. गुरव, दिगंबर एम. राऊळ, एन. आर. सनदी, आय. वाय. मेलगे, आर. टी. पवार, एल. एम. शानभाग, ए. सी. रोकडे, अवधूत एम. परब, पी. एस. साळुंखे, अमरनाथ के. फगरे, फत्तेसिंग पी. मुचंडी, सौ. अर्चना एन. पाटील, सौ. अंजली ए. साळवी यांच्यासह अँड. शंकर नावगेकर, सीईओ पी. बी. माळवी, सर्व शाखांचे व्यवस्थापक, सर्व कर्मचारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
तनिष्का ही आदर्श सोसायटीचे कायदा सल्लागार अँड. शंकर नावगेकर यांची कन्या होय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article