स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचा कळसारोहण सोहळा व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात

Ravindra Jadhav
स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचा कळसारोहण सोहळा व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव : मार्कंडेयनगर, ए.पी.एम.सी. बेळगांव येथील स्वयंभू श्री वरदविनायक मंदिराचा कळसारोहण सोहळा व धनलक्ष्मी – सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात आणि मंगलमय वातावरणात करण्यात आली.

बऱ्याच वर्षांनी आलेल्या मार्गशीर्ष शुक्लपक्ष क्रोधीसंवस्तर 1946 श्रवण नक्षत्र या दुर्मिळ मुहूर्तावर कारंजीमठ बेळगांवचे म.नि.प्र.गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण व प्राणप्रतिष्ठापना पार पडली. बैलहोंगल दुर्गा परमेश्वरी मंदिराचे महातेंश स्वामी व संगमेश्वर मंदिराचे पुजारी बसवराज स्वामी,संगमेश्वर नगर बेळगांव यांनी पौरोहित्य केले.

याप्रसंगी माजी खासदार मंगला अंगडी, समाजसेवक मोहन कारेकर, विकास कलघटगी, बांधकाम व्यावसायिक आर.एम.चौगुले व इतर अनेक जण प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरातील पंच कमिटी, महिला मंडळ, ज्येष्ठ सौ. सुनंदा पाटील, भरत कंग्राळकर, गजानन मेंडके, राजू बाळेकुंद्री, महांतेश पाटील, प्रविण शिरोडकर, प्रविण बिडीकर , प्रकाश मुतगेकर आदींनी विषेश परीश्रम घेतले.

गेल्या तीन डिसेंबर पासून रोज सायंकाळी 7 वाजता मार्कंडेय नगर महिला मंडळाच्या वतीने अखंड ललित सहस्त्रनाम पठण व भजन सुरू होते. हजारो भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. मंदिराचे प्रमुख व्यवस्थापक श्री मल्लिकार्जुन सत्तिगेरी यांनी सर्वांचे आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article