बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या आणि श्री बनशंकरी एज्युकेशन ट्रस्ट संचालित तात्यासाहेब मुसळे कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा आयोजित प्राथमिक विभागीय वडगाव-खासबाग क्लस्टर विभागाच्या योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत येथील कामधेनू शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या स्पर्धेत विविध शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय खेळाचे दर्शन घडवत कामधेनू शाळेच्या समर्थ कामकर आणि साई बामणे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना चेकमेट करीत बाजी मारली. तर योगा स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात जीत ढवळी आणि ऐश्वर्या ढवळी या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.