मुर्डेश्वर येथे झालेल्या अपघातातील मुलींना वाचवण्यात यश : जीएसएस कॉलेजच्या मुलांनी दाखविले धाडस : केला महाविद्यालयीन प्रशासनाने गौरव

Ravindra Jadhav
मुर्डेश्वर येथे झालेल्या अपघातातील मुलींना वाचवण्यात यश : जीएसएस कॉलेजच्या मुलांनी दाखविले धाडस : केला महाविद्यालयीन प्रशासनाने गौरव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मुर्डेश्वर येथील समुद्रात बुडणाऱ्या शालेय मुलींना वाचवण्यात यश मिळाले ते जीएसएस कॉलेजच्या मुलांनी दाखविलेल्या धाडसामुळे. मुर्डेश्वर येथे झालेल्या अपघातातील मुलींना वाचविणाऱ्या जीएसएस कॉलेजच्या मुलांची एस. के. इ. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाबासकी देत पाठ थोपटली आणि त्यांचा गौरव केला.

येथील जी एस एस कॉलेजच्या भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर गेली असता याचवेळी मुर्डेश्वर येथील समुद्रात कोलार येथील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थी बुडताना बघून जी. एस एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साहस करत समुद्रात धाव घेतली आणि बुडत असलेल्या तीन मुलींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे.

या बद्दल मिळालेली माहीती अशी की, जी एस एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक वर्ग 10 डिसेंबर रोजी उडुपी, गोकर्ण आणि मुर्डेश्वर येथे स्टडी टूरला गेले असता कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी कु. विनायक बडकर, कु श्रवण पाटील आणि प्रथमेश पाटील आणि इतर विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या जिवाची पर्वा न करता बुडत असलेल्या विद्यार्थिनींना वाचविण्यासाठी धावून गेले आणि यापैकी 3 जणींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले. याची दाखल घेत एस. के. इ. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी देत पाठ थोपटून त्यांचा गौरव केला.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. किरण ठाकूर, व्हा. चेअरमन श्री. एस. वाय. प्रभू, श्री. अशोक शानभाग आणि सेक्रेटरी श्री. मधुकर सामंत आणि श्रीमती लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी त्याच बरोबर कॉलेज चे प्राचार्य अरविंद हलगेकर , भूगर्भशास्त्राचे प्रमुख प्रा. सुरज मेणसे आणि इतर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article