Ad imageAd image

मच्छेत ‘ बाळगोपाळ ‘ तर्फे एसएसएलसी व्याख्यानमाला : तज्ज्ञ शिक्षक करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बाळगोपाळ कंपनीतर्फे दहावी विद्यार्थ्यांसाठी बाळ गोपाळ एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे दर रविवारी ही व्याख्यानमाला चालणार आहे.

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे तंत्र माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ही व्याख्यानमाला घेण्यात येत असून या व्याख्यानमालेत विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानमाला दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. सध्या दहावीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली असल्यामुळे व्याख्यानमालेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही व्याख्यानमाला दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना खुली असून मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, संतीबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, किणये आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळ गोपाळ कंपनीचे संचालक प्रा .डॉ. गोपाळ पाटील यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article