श्रींगारी कॉलनी गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Shringari colony ganeshotsav

Ravindra Jadhav
श्रींगारी कॉलनी गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 20 ( bn7news) : श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेश उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

महिलांसाठी हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सौ. प्रीती अभय पाटील, सौ. मीनाताई बेनके, सौ. प्रीती कामकर, सौ. शिल्पा हेतलकेरी, माधवी हिंडलगेकर, विजेता काकतीकर यासह या भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजसेवक शितल पाटील , विनायक कामकर, मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे, सुरेश वीरनगौडर उपस्थित होते.
तसेच कॉलनीतील लहान व मोठ्यासाठी नृत्य, गीत गायन, क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला ईत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, समाजसेवक दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडूस्कर, विश्वनाथ येळ्ळूरकर उपस्थित होते.
श्री मंडपात सत्यनारायन पूजा घालण्यात आली होती. पूजेला यजमान म्हणून गजानन तुडवेकर आणि नम्रता तुडवेकर उपस्थित होते.

हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे भटजी गणपती वडेर गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष शंकर कांबळे, भरत कागी , संतोष श्रींगारी, विनायक काकतीकर, बाळू मिराशी, संदीप रायकर, रविकुमार कमार, राज कदम, सिद्दू संबरगी, सूर्यकांत हिंडलगेकर, ॲड. शिवकुमार उडकेरी, जगदीश बडीगेर, अनिल अणवेकर, लालू बाडीवाले, प्रकाश शहापूरकर , प्रकाश श्रेयकर, सोहम हिंडलगेकर, प्रनय हनगोजी, श्रेयश दळवी, साईगोविंद चिकोर्डे यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article