सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळळूर मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Ravindra Jadhav
सीमावासीय शिक्षक मंच सामान्य-ज्ञान परीक्षेला येळळूर मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येळळूर : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच सामान्य ज्ञान परीक्षेला येळळूर मध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राचार्य शामराव पाटील होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश मरगाळे,मार्गदर्शक राजेंद्र मुतगेकर,
प्रमुख पाहुणे,संजय बेळगावकर, प्रकाश अष्टेकर, सतीश पाटील, मारुती मरगांणाचे, दत्ता उघाडे, प्रा. सी.एम. गोरल, बी एन मजुकर, बबन कानशिडे , पी वाय गोरल, शिवाजी सायनेकर, महेश जुवेकर, दुधाप्पा बागेवाडी, महेश जळगेकर, राजेंद्र चलवादी,मोहन पाटील, रूपा धामणेकर, जोतिबा उडकेकर उपस्थित होते.प्रास्ताविक विनायक पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय दत्ता उघाडे यांनी करून दिला. यावेळी निवृत्त प्राचार्य
शामराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार,भैरू अकनोजी,. निलेश सायनेकर, गोपाळ पाटील, गोपाळ चौगुले, चांदीलकर,जयवंत पाटील यांनी केला. या वेळी ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगावचे भैरू अकनोजी, विनायक पाटील , गोपाळ चौगुले निलेश सायनेकर, चंदीलकर, गोपाळ पाटील,जयवंत पाटील यांच्यासह शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता. सुत्रसंचलन गोपाळ पाटील यांनी केले.ही स्पर्धा 3 री ते 5 वी आणि 6 वी ते 7 वी अशा दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शेवटी हणमंत पाटील यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article