Ad imageAd image

तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा 10 नोव्हेंबर रोजी : सकाळी चन्नमा चौकातून काढली जाणार ध्यान मशाल रॅली

Ravindra Jadhav
तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा 10 नोव्हेंबर रोजी : सकाळी चन्नमा चौकातून काढली जाणार ध्यान मशाल रॅली
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : तेजज्ञान फाउंडेशन, या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार असून त्यानिमित्त ‘ ध्यान मशाल रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे.
10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता येथील कित्तूर राणी चन्नमा सर्कल येथून ध्यान मशाल रॅलीला सुरुवात करून 3 किलोमीटर अंतर कापून रेल्वे स्टेशन बेळगाव येथे रॅलीची सांगता केली जाणार आहे.
बेळगावचे लोकायुक्त एस पी श्री हणमंतराया (IPS) या सोहळ्याला उपस्थित राहणार असून नागरिकानी या शांतता रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनचे राजकुमार बिरादार व राजेंद्र मुचंडी यांनी केले आहे.

‘ हॅपी थॉट्स ‘ म्हणून ओळखली जाणारी तेजज्ञान फाउंडेशन ही सेवाभावी संस्था मागील 25 वर्षांपासून जागतिक शांततेसाठी काम करत आहे. भारत आणि जगभरात अनेक केंद्रांसह मुख्य केंद्र पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदोशी गावाजवळील मनन आश्रम येथे आहे.
बेळगावमध्ये कॅम्प (शंभूजत्ती मंदिर), शहापूर (बिच्चू गल्ली) आणि वडगाव (कारभार गल्ली) या तीन केंद्रांद्वारे बेळगावात तेजज्ञान फाउंडेशन कार्यरत आहे.

तणाव कमी करून लोकांना शांत आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. ध्यानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्याबरोबर ध्यानधारणा आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे विविध कार्यक्रम आणि उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात, अशी माहितीही तेजज्ञान फाउंडेशनच्या राजकुमार बिरादार व राजेंद्र मुचंडी यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article