मराठा गल्लीच्या श्री मूर्तीचे आज होणार दिमागात आगमन

Ravindra Jadhav
मराठा गल्लीच्या श्री मूर्तीचे आज होणार दिमागात आगमन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 4 (bn7 news) : 17 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ          ( एकनिष्ठ युवक मंडळ) मराठा गल्ली, महाद्वार रोड, क्रॉस नं. 2, बेळगाव या उत्सव मंडळाच्या श्री मूर्तीचा आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या दिमागत होणार आहे.

आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोकमान्य टिळक चौक येथून आगमन सोहळ्याला प्रारंभ होऊन शनिमंदिर मार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलावरून मराठा गल्ली येथे श्री गणेश मूर्तीचे आगमन होणार आहे.

श्री मूर्ती आगमन सोहळ्यात गल्लीतील माता-भगिनी पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होणार आहे. अग्रस्थानी ढोलताशांचा निनाद, मलखांब, लाठी, दांडपट्टा, तलवार बाजी असे शिवकालीन मर्दानी खेळ खेळणारे शिवभक्त असणार आहेत. आज होणाऱ्या या भव्यदिव्य आगमन सोहळ्याला गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे मंडळाचे अध्यक्ष मंदार नामदेव गावडे यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article