श्री बसवेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश एम. कळसन्नावर म्हणाले, ‘ प्रामुख्याने आरोग्याची काळजी घ्या ‘ : बँकेच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त केली गेली मोफत आरोग्य व नेत्र तपासणी

Ravindra Jadhav
श्री बसवेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश एम. कळसन्नावर म्हणाले, ‘ प्रामुख्याने आरोग्याची काळजी घ्या ‘ : बँकेच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त केली गेली मोफत आरोग्य व नेत्र तपासणी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी प्रामुख्याने घ्यावी, असे श्री बसवेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश एम. कळसन्नावर म्हणाले.

श्री बसवेश्वर सहकारी बँकेच्या 61व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बँकेच्या ‘अ’ वर्ग सदस्यांसाठी बँकेच्य क्लब रोड शाखा सभागृहात मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रमेश एम. कळसन्नावर यांनी उपरोक्त विचार मांडले.

डॉ. मंजुनाथ गड्डी, एमडी (बीएचएमएस) यांनी सभासदांची मधुमेह आणि रक्तदाब तपासणी केली. डॉ. प्रसाद जिरगे यांनी नेत्र तपासणी केली. या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ बँकेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने घेतला.
डॉ. के. एल.ई. प्रभाकर कोरे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रमेश एम. कळसन्नावर, बँकेचे उपाध्यक्ष गिरीश व्ही बागी, संचालक बाळाप्पा बी. कगन्नगी (व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष), प्रकाश एम. बाळेकुंद्री, बसवराज व्ही. झोंड, बसवराज व्ही. उप्पिन, श्रीमती सरला एस. हेरेकर, सौ. दीपा एम. कुडची, सतीश के. पाटील, संचालक चंद्रशेखर ए. हिरेमठ आणि व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य राजशेखर एस. चोणद, सोमशेखर बी. होंबळ, बँकेचे महाव्यवस्थापक शंकर एस. वाली आणि बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article