Ad imageAd image

हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंत्युत्सव साजरा : लेझीम व ढोल ताशाच्या गजरात पार पडली उत्सव मूर्तीची मिरवणूक

Ravindra Jadhav
हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंत्युत्सव साजरा : लेझीम व ढोल ताशाच्या गजरात पार पडली उत्सव मूर्तीची मिरवणूक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.

व्ही. बी. उन्नी परिवाराकडून देण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार रुपये देणगीतून यावेळी श्री बाळूमामांची चांदीची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली होती. जयंती उत्सवानिमित्त सदर मूर्तीची श्री बाळ्या स्वामी मठापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व सुहासिनी आरती व कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
श्री पंढरपूर संतांचे भजनी मंडळाचे भजन व श्री हेगडी अजांच्या संघातर्फे लेझीम व ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. या उत्सवाला आजूबाजूच्या वीस गावापेक्षा जास्त गावातून भाविक उपस्थित होते.

गावातील सर्व लहान मोठ्या देवळातून भेटी घेत प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक श्री बाळूमामा देवस्थान येथे दाखल झाली. श्री बाळूमामांची उत्सव मूर्ती मंदिरात आल्यानंतर रुद्राभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम झाला.

सायंकाळी विराप्पा उन्नी व त्यांच्या धर्मपत्नी अनुसया उन्नी तसेच वीरेश कोठूर व चैत्रा कोठूर यांच्या हस्ते मूर्तिकार सतीश पत्तार बेळगांव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक हिरे बुंदनुर, सरकारी उच्च माध्यमिक शाळा, तसेच कुटरनदि सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आय. आर. काजगार या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कमिटी अध्यक्ष नागराज देसाई तसेच सर्व सदस्य हिरे बुंदनूर ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती मंजुळा नाचकर, देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी रायाप्पा हुनशीकट्टि यासह सर्व सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article