बहुजन समाजाच्या हितासाठी कै. अर्जुनराव घोरपडे यांचे कार्य कौतुकास्पद : शरद पवार

Ravindra Jadhav
बहुजन समाजाच्या हितासाठी कै. अर्जुनराव घोरपडे यांचे कार्य कौतुकास्पद : शरद पवार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : बहुजन समाजाच्या हितासाठी कै. अर्जुनराव घोरपडे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी केवळ सहकारच नाही तर शिक्षण उद्योग व इतर क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले.
मराठा मंदिर सभागृहात आयोजित सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळ्यात माननीय शरद पवार यांनी अर्जुनराव घोरपडे यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेताना उपरोक्त गौरवोद्गार काढले.

कै. अर्जुनराव घोरपडे यांनी बेळगावमधील लोकांना एकत्र आणून सहकाराच्या जोरावर उत्तुंग कामगिरी बजावली. सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या हयातीत सर्वसामान्यांना सकारात्मकतेची ऊर्जा दिली. मराठा बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली. यामुळे बेळगाव शहर परिसरात अनेक लहान-मोठे उद्योजक उभे राहिले. बँकेच्या माध्यमातून त्यांनी समाज हितासाठी हातभार लावला. समाजाप्रती त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे असेही माननीय शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सरकारचे निवृत्त पणन अधिकारी दिनेश ओऊळकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरपर्सन भाविकाराणी होनगेकर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना दिनेश होळकर यांनी कै. अर्जुनराव घोरपडे यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच मराठा बँकेच्या प्रगतीबद्दल आणि बहुजन समाजासाठी बँक देत असलेल्या सेवेबद्दल प्रशंसा केली

प्रारंभी शरद पवार यांच्या हस्ते मराठा मंदिर नुतनीकरण कामाची कोनशिला रोवण्यात आली. मालोजीराव अष्टेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर अर्जुनराव घोरपडे यांच्या जीवनावर आधारित
‘ स्मृतिगंध ‘ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांच्या भाषणानंतर अध्यक्षीय भाषणांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रा. आनंद मेणसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आप्पासाहेब गुरव यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article