शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : मांडल्या समस्या : दिले मागणीचे निवेदन

Ravindra Jadhav
शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : मांडल्या समस्या : दिले मागणीचे निवेदन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 14 ( प्रतिनिधी) : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्याकरिता 5 वर्षासाठी एकदाच आवश्यक सर्व परवानग्या दिल्या जाव्यात अशी मागणी शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे मुजवावेत, लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा सुरळीत कराव्यात, रस्त्यात आडव्या येणाऱ्या झाडाच्या फांद्या हटवाव्यात, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

याप्रसंगी माजी नगरसेवक नेताजी जाधव, सरकारनियुक्त नगरसेवक रमेश सोनटक्की, अशोक चिंडक, राजू सुतार, पी. जे. घाडी आदींसह शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article