एम्पायर शोटोकॉन कराटे स्पर्धेत ‘ सेल्फ डिफेन्स स्कुल ऑफ इंडियन कराटे ‘च्या विद्यार्थ्यांचे सुयश

Ravindra Jadhav
एम्पायर शोटोकॉन कराटे स्पर्धेत ‘ सेल्फ डिफेन्स स्कुल ऑफ इंडियन कराटे ‘च्या विद्यार्थ्यांचे सुयश
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : हुबळी येथे घेण्यात आलेल्या एम्पायर शोटोकॉन खुल्या आणि राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावमधील सेल्फ डिफेन्स स्कुल ऑफ इंडियन कराटेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशसह इतर राज्यातील 1200 हून अधिक कराटे पटूंनी भाग घेतला होता.

8 वर्षे वयोगटात निधी वेर्णेकर हिने चार फेऱ्या जिंकून चषक पटकाविले. 10 वर्षे वयोगटात दिप्ती करमळकर, स्वरा गावडे, विघ्नेश बाबीचे, अखिलेश पाटील व आनंद पाटील ( सर्व विद्यार्थी शांतिनिकेतन स्कुल, खानापूर), 14 वर्षांवरील वयोगटात कृष्णा, निवेदन पाटील, सुकीत गलगली, गगन जकन्नवर ( सेंटपॉल स्कुल) तसेच जान्हवी व परिणीती फाटक यांनी प्रत्येकी 5 फेऱ्या जिंकून कटाज व फाईट मध्ये चषक व प्रमाणपत्र मिळविले.
ब्लॅकबेल्ट स्पर्धेत 15 वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात 5 फेऱ्या जिंकून प्रिया वेर्णेकर या कराटेपटूंने स्पायरिंग ( फाईट) मध्ये पहिला क्रमांक पटकावला. तिला चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बेळगावचे ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक मास्टर मधू पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

वरील कराटेपटूंना कराटे मास्टर मधू पाटील, प्रशिक्षक प्रसाद पाटील व आकाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article