सतिशअण्णा चषक खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा होणार शनिवार- रविवारी : स्पर्धेसाठी दिली जाणार एकूण साडेतीन लाखांची बक्षिसे

Ravindra Jadhav
सतिशअण्णा चषक खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा होणार शनिवार- रविवारी : स्पर्धेसाठी दिली जाणार एकूण साडेतीन लाखांची बक्षिसे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) :
सतीशअण्णा फॅन्स क्लबच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित सतिशअण्णा चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला शनिवारी प्रारंभ होणार असून शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 सप्टेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.

गोवावेस येथील महावीर भवनात सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना दिली जाणार आहे.

स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेसह 56 चषक, 53 पदके व 3 ढाली दिल्या जाणार आहेत. खुल्या गटातील पहिल्या सहा विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख, 50 हजार, 25 हजार, 15 हजार, 10 हजार, 8 हजार रुपये व चषक तर त्यापुढे पंधराव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख रक्कम व पदक दिले जाणार आहे. 16 व्या ते 25 व्या क्रमांकापर्यंतच्या स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपये व पदक दिले जाणार आहे.
आठ, दहा, बारा, चौदा व सोळा वर्षांखालील वयोगटासाठी प्रत्येकी 3 हजार, 2 हजार 500, 2 हजार, 1 हजार 500, 1 हजार 200 रुपये व चषक अशी एकूण 15 बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू (55 प्लस), उत्कृष्ट महिला खेळाडू (18 प्लस), उत्कृष्ट बेळगावकर (16 वर्षांखालील), उत्कृष्ट अकॅडमी यांना प्रत्येकी चार हजार, दोन हजार व एक हजार रुपये आणि पदक दिले जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेत कर्नाटकासह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व गोव्यातील बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रमुख आरबिटर म्हणून पौर्णिमा उपावलकर व सक्षम जाधव, भरत चौगुले, करण पाटील, दीपक वैचळ व विपीन यादव हे काम पाहणार आहेत.

स्पर्धेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांकरिता राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. इच्छूक स्पर्धकांनी आपली नावे गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी निलेश भंडारी, प्रशांत अणवेकर, शानवाज किल्लेदार, संतोष निट्टूरकर, झाहिद वंटमुरी, विजय वेर्णेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article