सरीता सोनारने पटकाविले रौप्य

Ravindra Jadhav
सरीता सोनारने पटकाविले रौप्य
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगांव जिल्हा कराटे संघटना आणि इंडियन कराटे क्लबची विद्यार्थीनी सरिता सोनार (अनुष्का) हिने किओ ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

दि. 14 व 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथील तलकातोरा स्टेडियम येथे ही किओ ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत बेळगावच्या सरिता सोनार (अनुष्का) हिने उल्लेखनीय खेळाचे दर्शन घडवत रौप्य पदक पटकाविले.

सरीता सोनार ही कराटे प्रशिक्षक हरीश सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचा सराव करते. तिला बेळगांव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष श्री. गजेन्द्र काकतीकर, उपाध्यक्ष श्री. रमेश अलगुडेकर, सरचिटणीस श्री. जितेन्द्र काकतीकर आणि खजिनदार श्री. दिपक काकतीकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article