विद्याभारती राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत संत मीराचे यश : केली 6 पदकांची कमाई

Ravindra Jadhav
विद्याभारती राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत संत मीराचे यश : केली 6 पदकांची कमाई
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 11 ( bn7 news) : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदके पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकर हिने लांब उडी व तिहेरी उडीत दोन सुवर्णपदक, समीक्षा बुद्रुकने 3000 मीटर धावणे रौप्यपदक , मनस्वी चतुरने थाळीफेक स्पर्धेत रौप्यपदक, भावना बेर्डेने 100 मीटर धावणेत रौप्यपदक तर साक्षी राजाराम पाटील हिने 3 किलोमीटर चालणेत कांस्यपदक पटकाविले आहे.

वरील खेळाडूंची गुंटूर विजयवाडा येथे दिनांक 14 व 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी हा संघ गुरुवार दिनांक 12 रोजी हुबळी मार्गे विजयवाड्याला क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, आनंद कुलकर्णी यांच्यासह रवाना होत आहे.
या संघाला क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व पालक वर्गांचे प्रोत्साहान लाभत आहे.

फोटो ओळी
पदक विजेत्या खेळाडू समवेत बसलेले सुजाता दप्तरदार ऋतुजा जाधव चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article