Ad imageAd image

विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे संघ रवाना

Ravindra Jadhav
विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे संघ रवाना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शालेय मुला-मुलींचे प्राथमिक व माध्यमिक हँडबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशला रवाना झाले.
खुर्जिया, पश्चिम उत्तरप्रदेश येथील सरस्वती-लक्ष्मी चंद्र सरस्वती विद्यामंदिर वरिष्ठ माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेकरिता संत मीरा शाळेच्या क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, अमृता पेटकर, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील हे संघासमवेत उत्तर प्रदेशला रवाना झाले.
या प्राथमिक मुलांच्या संघात कर्णधार निरज घाडी, उपकर्णधार उत्कर्ष कणसे, स्वराज लगाडे, समर्थ गावडे अजमत शानुर, श्रेयस किल्लेकर, मनिष शेट्टी, फरहान नदाफ , पृथ्वीराज बजंत्री, प्रथमेश कुडतरकर, आर्यन कलखांबकर,वीर लगाडे तर माध्यमिक संघात सोहेल बिजापुरे, श्रेयस खांडेकर, रोहन करेगार तसेच प्राथमिक मुलींच्या संघात कर्णधार मेघा कलखांबकर,
उपकर्णधार हिंदवी शिंदे, आलिया नदाफ, श्रेया अनगोळकर,भावणा बेरडे, विनया दिवटे, प्रणिती बडमबंजी,आरोही देसाई,सान्वी कुलकर्णी, पूर्वी बडबंजी, स्वाती पडनडी, ईश्वरी कुलकर्णी तर माध्यमिक मुलींच्या संघात कर्णधार समीक्षा बुद्रुक, उपकर्णधार मनस्वी चतुर, श्रावणी बडमंजी, ऋतिका हलगेकर, साक्षी पाटील, प्रणिता मजुकर, अमृता करेगार यांचा समावेश आहे.

या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शिक्षक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article