सरकारी कन्नड शाळेचा संजय लोहार आणि व्हीआरकेसीचा सुमित रुद्रापूर यांची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

Ravindra Jadhav
सरकारी कन्नड शाळेचा संजय लोहार आणि व्हीआरकेसीचा सुमित रुद्रापूर यांची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : काकती येथील सरकारी कन्नड शाळेचा विद्यार्थी संजय लोहार आणि व्हीआरकेसीचा विद्यार्थी सुमित रुद्रापूर या दोघा क्रिकेटपटूंची निवड विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केलेल्या काकती येथील सरकारी कन्नड शाळेचा विद्यार्थी संजय लोहार (प्राथमिक गट ) तर व्हीआरकेसीचा विद्यार्थी सुमित रुद्रापूर (माध्यमिक गट) या दोन क्रिकेट खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी बेळगाव शहर जिल्हा संघात करण्यात आली आहे.

या दोघा क्रिकेटपटूंना बेळगाव ग्रामीणचे क्रिकेट प्रशिक्षक सुनील देसाई व क्रीडा शिक्षक महेश अक्की यांचे मार्गदर्शन तर दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन लाभत आहे. हे क्रिकेटपटू बेळगाव जिल्हा संघाचे प्रशिक्षक नागराज भगवंतनवर व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article