Ad imageAd image

सत्य साई कॉलनीतील रहिवाशांना अखेर मिळाली घरांची हक्कपत्रे : नागरी समस्या सोडविण्याची आमदार राजू सेठ यांनी दिली ग्वाही

Ravindra Jadhav
सत्य साई कॉलनीतील रहिवाशांना अखेर मिळाली घरांची हक्कपत्रे : नागरी समस्या सोडविण्याची आमदार राजू सेठ यांनी दिली ग्वाही
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : सत्य साई कॉलनी, बेळगाव येथील रहिवाशांना घरांचे हक्कपत्र वितरीत करण्यात आले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते रहिवाशांना हक्कपत्र प्रदान करण्यात आले.

सत्य साई कॉलनी, बेळगाव येथील रहिवाशी मागील 20 वर्षांपासून घरांच्या हक्कपत्राच्या प्रतीक्षेत होते. अखेर आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रयत्नांतून येथील रहिवाशांच्या मागणीला यश आले आहे.

आयोजित कार्यक्रमात आमदार राजू सेठ यांनी कॉलनीतील रहिवाशांना घरांचे हक्कपत्र वितरीत केले. यावेळी त्यांनी कॉलनीतील नागरी समस्या लवकरच सोडविण्याची ग्वाही नागरिकांना दिली.
यानंतर त्यांनी वैभव नगर आणि मन्नत कॉलनीला भेट देऊन परिसरातील समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.

यावेळी स्थानिक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article