बेळगांव जिल्हा सहकार खात्याच्या डेप्युटी रजिस्ट्रारपदी बढती मिळाल्याबद्दल रविंद्र पारसगौडा पाटील यांचा ‘ नवहिंद ‘ कडून सन्मान

Ravindra Jadhav
बेळगांव जिल्हा सहकार खात्याच्या डेप्युटी रजिस्ट्रारपदी बढती मिळाल्याबद्दल रविंद्र पारसगौडा पाटील यांचा ‘ नवहिंद ‘ कडून सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येळ्ळूर : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को ऑप. क्रेडीट सोसायटी लि; या संस्थेच्या वतीने बेळगांव जिल्हा सहकार खात्याच्या डेप्युटी रजिस्ट्रारपदी बढती मिळाल्याबद्दल रविंद्र पारसगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

नवहिंद भवनच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. व्यासपिठावर नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, न्यू नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन एन. बी. जाधव, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा निता जाधव उपस्थित होत्या.

प्रारंभी संस्थेचे व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांनी प्रास्ताविक करुन सत्कारमूर्तीचा परिचय करुन दिला. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्याच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नवहिंदचे सेक्रेटरी आनंद पाटील यांनी ईशस्तवन सादर केले.

प्रल्हाद पाटील, जे. एस. नांदूरकर, मॅनेजर सी. पी. बंगारी, प्रा. सी. एम. गोरल यांनी रविंद्र पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगतात प्रकाश अष्टेकर यांनी रविंद्र पाटील असि. रजिस्ट्रार असताना नवहिंदला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यापुढे ही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, राजहंसगड सोसायटी, न्यू नवहिंद सोसायटी, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटी, नवहिंद क्रीडा केंद्र, नवहिंद महिला प्रबोधन संघ, नेताजी सोसायटी, सैनिक सोसायटी, प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटी, स्वामी विवेकानंद सोसायटी, मंगाई सोसायटी, छत्रपती शिवाजी सोसायटी, सन्मित्र सोसायटी या येळ्ळूरातील विविध संस्थाच्या वतीने रविंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना रविंद्र पाटील यांनी, ‘ नवहिंद संस्था व गावातील इतर सहकारी संस्थानी माझा जो सत्कार केला आहे, त्यामुळे मी भारावून गेलो असून असा भव्य सत्कार कुठेही झाला नाही. तुमच्या सर्व संस्थांची प्रगती होत राहो आणि त्यासाठी माझ्याकडून कायद्याच्या चौकटीतून जे सहकार्य हवे ते मी सतत तुम्हाला देईन, असे म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले. तर आभार सरिता जाधव यांन मानले.
कार्यक्रमास अर्जुन गोरल, रावजी पाटील, प्रदिप मुरकुटे, सी. बी. पाटील, उदय जाधव, संभाजी कणबरकर, भिमराव पुण्याण्णावर, श्रीधर धामणेकर, वाय. एन. पाटील, सुरेखा सायनेकर, प्रगती पाटील, परशराम घाडी, रघुनाथ मुरकुटे, दिपक कर्लेकर, यल्लाप्पा बागेवाडी, सतिश पाटील, मल्लाप्पा कुंडेकर, राजू पाटील व इतर संचालक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article