Ad imageAd image

मराठी भाषेमध्ये समृद्ध अशी साहित्य परंपरा : रणजीत चौगुले

Ravindra Jadhav
मराठी भाषेमध्ये समृद्ध अशी साहित्य परंपरा : रणजीत चौगुले
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येळळूर : मराठी भाषा ही प्राचीन असून ती समृद्ध अशी भाषा आहे, कालानुरूप प्रत्येक कालखंडामध्ये मराठी भाषेचे स्वरूप बदलत गेले असून प्रत्येक कालखंडामध्ये मराठी भाषेचे साहित्य हे समृद्ध असेच आहे. या भाषेची स्वतंत्र अशी प्रज्ञा आहे. मराठी भाषेमध्ये समृद्ध अशी साहित्य परंपरा आहे. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेचे संवर्धन व विकास होण्यास आता मदत होणार आहे, असे शिक्षक रणजीत चौगुले म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, बालगणेश उत्सव मंडळ व नवरात्री उत्सव महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिक्षक रणजीत चौगुले बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. व्यासपीठावर पाहुणे म्हणून, शिक्षक रणजीत चौगुले, साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, सचिव डॉ. तानाजी पावले, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे रवींद्र गिंडे उपस्थित होते.

प्रारंभी ज्ञानेश्वर व सरस्वती प्रतिमेचे पूजन रणजीत चौगुले व बळीराम देसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले, प्रास्ताविक प्रा. सी.एम गोरल यांनी केले. त्यानंतर नेताजी सोसायटीच्या वतीने पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व पाठपुरावा समितीचे सदस्य या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर रणजित चौगुले यांनी मराठी भाषेमध्ये समृद्ध अशी साहित्य परंपरा असल्याचे म्हटले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील, संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनीही मराठी भाषेचा प्राचीन काळापासून कसा उत्कर्ष होत गेला हे सांगताना त्यांनी , मराठी भाषा ज्ञानभाषा कशी आहे हे त्यांनी सांगितले.

यावेळी परशराम गिंडे, सी.एम. उघाडे, बळीराम देसुरकर, रमेश धामणेकर, जोतिबा उडकेकर, गणपती हट्टीकर, भोमाणी छत्र्यान्नावर, शंकर मुरकुटे, जोतिबा गोरल, अनिल मुरकुटे, मीनाजी नाईक, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, सुशांत घाडी, संगीता दणकारे अदीसह नेताजी सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी.एम. गोरल यांनी केले तर आभार जोतिबा उडकेकर यांनी मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article