‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ स्पर्धा उत्साहात पार : राधिका राजगोळकर यांनी जिंकली विजेतेपदाची पैठणी तर जान्हवी बद्री ठरल्या उपविजेत्या

Ravindra Jadhav
‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ स्पर्धा उत्साहात पार : राधिका राजगोळकर यांनी जिंकली विजेतेपदाची पैठणी तर जान्हवी बद्री ठरल्या उपविजेत्या
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : तारांगण आयोजित आणि सुनील टेक्सटाईल्स प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा’ होम मिनिस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राधिका राजगोळकर यांनी पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले तर जान्हवी बद्री उपविजेत्या ठरल्या.

कार्यक्रमाला उद्योगपती सुनील काठारिया, सुनिता काठारिया , अरुणा गोजे – पाटील , टी डी पाटील उपस्थित होते.
गुंपण साहित्य अकादमीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झालेल्या बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बिळगोजी यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत लिंबू चमचा, संगीत खुर्ची, चिमटे लावणे, स्ट्रॉ केसात घालणे, प्लास्टिक ग्लास मनोरा रचना, फुगे फोडणे, लंगडी घालणे यांसारखे एकूण दहा खेळ आयोजित करण्यात आले होते.
राधिका राजगोळकर यांनी विजेतेपद मिळवत पाच हजार रुपयांची पैठणी जिंकली, तर उपविजेत्या जान्हवी बद्री यांना चार हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील आणि संजय साबळे यांनी केले. तारांगणच्या प्रमुख अरुणा गोजे-पाटील यांनी प्रारंभी स्वागत केले आणि शेवटी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article