बेळगाव : महाद्वार रोड स्थित श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीच्या वतीने पायोनियर बँकेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर व संचालक अनंत लाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
या सोसायटीचे अष्टेकर व लाड हे दोघेजण संस्थापक असून पायोनियर बँकेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते दोघेही विजयी झाले. तसेच प्रदीप अष्टेकर यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी सर्वश्री सुभाष देसाई ,सुनील चौगुले, के बी संकनावर यांची भाषणे झाली.
चेअरमन श्री सुभाष देसाई आणि माजी चेअरमन श्री अनंत पाटील यांच्या हस्ते अष्टेकर व लाड यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराबद्दल दोघांनीही कृतज्ञता व्यक्त केली आणि बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी जोमाने कार्य करू असे सांगितले.
याप्रसंगी संचालक विकास मजूकर, महादेव ठोकनेकर, बाळकृष्ण दंडगलकर, आनंद बाचुळकर, कल्पना मोहिते यांच्यासह व्यवस्थापक के बी संकनावर, अकाउंटंट सौ सुषमा संजीव देशपांडे, गजानन पवार व प्रवीण अष्टेकर आदी उपस्थित होते.