गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांशी पोलिसांची आढावा बैठक

Ravindra Jadhav
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांशी पोलिसांची आढावा बैठक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मंडळांचे 70 हून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मार्केट पोलीस निरीक्षक एम. के. धामनवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावनवर व्यासपीठावर उपस्थित होते .

बेळगावातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. विभागनिहाय बैठका आयाोजित केल्या जाणार आहेत, अशी माहिती लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी दिली.

मंडपामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेक मंडळे वर्गणी न घेता उत्सव साजरा करतात. जाहिरात कमानीच्या माध्यमातून मंडळांना निधी उपलब्ध होतो. स्टाॅल आणि कमानी उभ्या करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही. ज्या मंडळांकडे परवाने नाहीत त्या मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक एम. के. धामनवर यांनी सांगितले. मंडळांना काही अडचण आल्यास त्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

मार्केट पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस सुनील जाधव यांनी, गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी कथन करून काही सूचना केल्या. गल्लीतील गणेश मंडळांनी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा, रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्‍यात यावे, रस्त्यांची डागडुजी गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी, गणेशोत्‍सव काळात येणाऱ्या भक्‍तगणांचे धक्काबुकी होणार नाही तसेच महिलांची छेडछाड होणार नाही याची काळजी घ्यावी, सदैव विद्युत वितरण विभाग कार्यान्वीत राहील यादृष्टीने पूर्व नियोजन करावे, वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्‍यावी, वाहतुकीच्या सोयीसाठी एस.टी बसचे नियोजन करून आवशक्यतेप्रमाणे वाहने उपलब्ध करुन द्यावीत, गणेश चतुर्थी निमित्त येणारे आणि परत जाणारे प्रवासी यांच्यासाठी जादा गाड्यांची उपलब्‍धता याबाबत नियोजन करुन प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय होणार नाही यादृष्‍टीने नियोजन करावे असेही सुनील जाधव यांनी सांगितले.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अनेक सूचना मांडल्या.
विजय जाधव, रणजित चव्हाण-पाटील, सुनील जाधव, रोहित रावळ, राजकुमार खटावकर, आनंद आपटेकर यांनीही यावेळी विचार मांडले.
यावेळी संतोष कणेरी, संजय नाईक, जोतिबा पवार, विनायक बावडेकर, अरुण पाटील, इंद्रजित पाटील, विकास कलघटगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article