Ad imageAd image

बिजगर्णी हायस्कूलमध्ये रंगणार कवी संमेलन : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्यावतीने होतेय संमेलनाचे आयोजन

Ravindra Jadhav
बिजगर्णी हायस्कूलमध्ये रंगणार कवी संमेलन : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्यावतीने होतेय संमेलनाचे आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : कावळेवाडी ( तालुका : बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्यावतीने कवी संमेलन आयोजिण्यात आले आहे.

बिजगर्णी हायस्कूल येथे दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन एस. एम. जाधव यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील नामदेव मोरे राहणार आहेत असून प्रतिमा पूजन आर. बी. देसाई यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन पी.आर. गावडे, डॉ.परशराम हुंद्रे, भाऊराव कणबरकर , के.आर. भाष्कळ , यल्लापा बुरुड यांच्या हस्ते होणार आहे
शिवाजी शिंदे, विठ्ठल कदम, निलेश पालकर, बसवंत शहापूरकर, महादेव खोत, परशराम खेमणे, सुधाकर गावडे, चंद्रशेखर गायकवाड, मोहन पाटील, रुपेश पाटील, भरत गावडे, निलेश शिंदे, मयुर नागेनट्टी, उर्मीला शहा, मनीषा नाडगौडा, प्रा.अशोक आलगुंडी आदी निमंत्रित कवी मान्यवरांच्या उपस्थितीत हे कवी संमेलन रंगणार आहे

सर्वांनी उपस्थित राहून कवी संमेलनाला रंगत आणावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, मनोहर मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article