Ad imageAd image

मराठी शाळा, बेनकनहळळी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम पंडित पिसाळे तर सचिव म्हणून मोनेश्वर तुकाराम कांबळे यांची निवड

Ravindra Jadhav
मराठी शाळा, बेनकनहळळी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम पंडित पिसाळे तर सचिव म्हणून मोनेश्वर तुकाराम कांबळे यांची निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मराठी शाळा, बेनकनहळळी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम पंडित पिसाळे तर सचिव म्हणून मोनेश्वर तुकाराम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. यामध्ये संघटनाअध्यक्षपदी परशराम पंडित पिसाळे, उपाध्यक्षपदी गजानन निंगाप्पा पाटील, सचिव म्हणून मोनेश्वर तुकाराम कांबळे तर खजिनदार पदी यल्लाप्पा लक्ष्मण देसूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

ब्रम्हलिंग को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी मारुती पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश कोलकार, डॉ. श्री. राजु पाटील, शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष
कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील तसेच उपाध्यक्ष वैजनाथ मोनाप्पा पाटील यांच्या उपस्थितीत निवडीचे कार्य पूर्ण करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत शिक्षक बाळेकुंद्रीकर सर यांनी केले. मुख्याध्यापिका श्रीमती एस.एम. बंकापूर यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षक ईश्वर पाटील यांनी सुत्रसंचालन केले. शिक्षक एम. एन पाटील यांनी आभार मानले.
यावेळी माजी विद्यार्थी तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article