Ad imageAd image

जम्मू-काश्मीर अपघातात पंत बाळेकुंद्रीचा जवान शहीद

Ravindra Jadhav
जम्मू-काश्मीर अपघातात पंत बाळेकुंद्रीचा जवान शहीद
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीनगर : बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकण्णवर हा जवान जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात काल मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात शहीद झाला आहे.
दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

जम्मू जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. या घटनेत दयानंद तिरकण्णवर हा जवानही गंभीर जखमी झाला होता. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान दयानंद तिरकण्णवर यासह 5 जवानांची प्राणज्योत मालवली.

दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत. या घटनेने पंत बाळेकुंद्री आणि सांबरा गावावर शोककळा पसरली आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article