कन्यकंबा वैश्य युवती संमेलन उत्साहात : दोन दिवशीय शिबिरात घेतला होता 70 हून अधिक जणांनी भाग

Ravindra Jadhav
कन्यकंबा वैश्य युवती संमेलन उत्साहात : दोन दिवशीय शिबिरात घेतला होता 70 हून अधिक जणांनी भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री संस्थान शांताश्रम कुलगुरू मठ काशी व हळदीपूर यांच्या विद्यमानाने श्री चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी (शाखा मठ) गोवावेस बेळगाव येथे वैश्य समाजातील 15 ते 40 वयोगटातील महिला व युवतींसाठी अखिल कर्नाटक कंन्यकांबा युवती संमेलन भरविण्यात आले होते.
शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 डिसेंबर असे दोन दिवस संमेलन झाले.

या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘अंकुर’ संस्थेच्या संस्थापिका गायत्री गावडे उपस्थित होत्या. वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, शाखा मठ अध्यक्ष समीर अनगोळकर, तसेच कन्याकांबा कमिटी अध्यक्षा वैशाली पालकर, उपाध्यक्षा शुभांगी देवलापूरकर, खजिनदार अक्षता कलघटगी, सेक्रेटरी लक्ष्मी बिडीकर, उपसेक्रेटरी प्रणाली कपिलेश्वरी याप्रसंगी उपस्थित होत्या.

प्रारंभी स्वागत गीत झाले. दिप प्रज्वलन केल्यानंतर श्री .समादेवी आणि श्री.वामनाश्रम फोटोचे पूजन करण्यात आले. शारदा काणेकर यांनी कन्यकांबा संमेलनाचे महत्त्व विशद केले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मठाच्या वतीने समीक्षा फायदे, अंजली शेठ, शोभा शेट्टी, श्री सुदर्शन प्रभू, आहारतज्ञ डॉ. सोनाली पावले, अनिता कणबर्गी यांनी मार्गदर्शन केले
या संमेलनामध्ये भाषण, चर्चासत्र, गीता पठण, नृत्य स्पर्धा, अग्निविरहित पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिराला 70 हून अधिक शिबिरार्थीचा सहभाग लाभला. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रियांका मुरकुंबी आणि आणि राधिका कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैश्य समाजातील कार्यकारिणी सदस्य-सदस्या यांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article