Ad imageAd image

लोकप्रिया जनसेवा संस्थेच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ravindra Jadhav
लोकप्रिया जनसेवा संस्थेच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : लोकप्रिया जनसेवा संस्था यांच्यावतीने आणि मॅडोज क्रिएटिव्ह प्रोडक्शन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वा.चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“मेक इन इंडियाचा प्रभाव” ह्या घोष वाक्याखाली ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

बॅ. नाथ पै सर्कल शहापूर येथील लोकप्रिय जनसेवा संस्था कार्यालय आवारात ही स्पर्धा होणार आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत

स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहराचे गट शिक्षणाधिकारी श्री. रवि भजंत्री तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री महादेवप्पा कम्मार उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी व्हाट्सअप क्रमांक 9449575806 अथवा गजानन साबण्णावर, अध्यक्ष, लोकप्रिय जनसेवा संस्था, बेळगाव यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article