Ad imageAd image

2 ऑक्टोबरला साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन

Ravindra Jadhav
2 ऑक्टोबरला साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी
सामाजिक संस्थेच्यावतीने साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये गांधी जयंतीदिनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमानंद गुरव राहणार असून कार्यशाळेचे उदघाटन प्रताप सुतार यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी विजया नाईक यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. स्वागताध्यक्ष शंकर चौगले हे असून यावेळी माननीय धनाजी मोरे व के. आर. भाष्कळ यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (आरसीयू, बेळगाव) व प्रा.सौ. मानसी दिवेकर (कोल्हापूर) आदी मान्यवर ‘साहित्य लेखन कसे करावे’ , या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या साहित्य लेखन कार्यशाळेत साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साहित्यविषयक अभिरुची जोपासावी असे आवाहन वाय पी नाईक, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, कोमल गावडे यांनी केले आहे. नाव नोंदणी करण्यासाठी वाय. पी. नाईक, मोबाईल क्रमांक 9420204105 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article