भीषण अपघात : एकाचा मृत्यू : सुदैवाने एकजण बचावला

Ravindra Jadhav
भीषण अपघात : एकाचा मृत्यू : सुदैवाने एकजण बचावला
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : निपाणी-मुधोळ राज्यमार्गावर उमराणीजवळ कार आणि केएसआरटीसी बस यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील दोन एअर बॅग उघडल्याने कारमधील आणखीन एक व्यक्ती बचावली.
निर्मला भरमू आवटे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नेमिनाथ भरमू आवटे (वय 43) असे अपघातात बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमिनाथ भरमू आवटे हे चिक्कोडी हेस्कॉम उपविभागीय सहाय्यक अभियंता असून ते कारने चालले होते. त्यांची आई निर्मला भरमू आवटे ह्या कारच्या मागील आसनावर बसल्या होत्या. उमराणीजवळ कार आणि केएसआरटीसी बस यांच्यात अपघात झाला. यावेळी कारमधील दोन एअर बॅग उघडल्याने सुदैवाने नेमिनाथ भरमू आवटे बचावले. मात्र, कारच्या मागील आसनावर बसलेल्या निर्मला भरमू आवटे यांचा जागीच मृत्यू झाला.
आवटे कुटुंबीय हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरातील असून सध्या ते चिक्कोडी शहरातील यादवनगरात राहते.
अपघातातील जखमी अभियंता नेमिनाथला उपचारासाठी चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिक्कोडी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article