‘ वन फाउंडेशन’ ने केला ‘ प्यास फाउंडेशन ‘चा उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल सत्कार

Ravindra Jadhav
‘ वन फाउंडेशन’ ने केला ‘ प्यास फाउंडेशन ‘चा उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल सत्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 29 ( प्रतिनिधी) : नष्ट होत चाललेले जलस्रोत वाचविण्यासाठी आणि पुरातन तलावांना पुनरुज्जीवन देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘ प्यास फौंडेशन ‘ या संस्थेचा सत्कार ‘ वर्क फौंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला.

प्यास फौडेशन ही पाण्यासाठी कार्य करणारी संस्था असून गेली कित्येक वर्ष ही संस्था ग्रामीण व शहरी भागात पाण्याच्या नियोजनसाठी डॉ. माधव प्रभू व डॉ प्रिती कोरे यांच्या मार्गद्शनाखाली कार्य करीत आहेत. ‘ प्यास’ च्या या उललेखनीय कार्याबद्दल वर्क फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकताच प्यास फौडेशन टीमचा सत्कार करण्यात आला.

‘प्यास’ च्या वतीने सूर्यकांत हिंडलगेकर व दिपक ओऊळकर यांनी हा सत्कार स्विकारला. हा सत्कार प्रजापिता विश्व विद्यालयच्या ब्रम्हकुमारी साधना दिदी व ब्रम्हकुमारी संमती दिदी यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी वर्क फाउंडेशनच्या सुमय्या मुजावर व संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article