Ad imageAd image

भरधाव दुचाकीस्वाराची ठोकर : एकाचा जागीच मृत्यू

Ravindra Jadhav
भरधाव दुचाकीस्वाराची ठोकर : एकाचा जागीच मृत्यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : भरधाव दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराला ठोकर दिली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव वाहन चालविणाऱ्या दुचाकीच्या मागील आसनावर बसलेला तरुण जखमी झाला. हिंदवाडी येथील आयएमईआर जवळ काल सोमवारी रात्री ही घटना घडली.

निखिल शांतीनाथ पाटील (वय 37 रा. आदर्शनगर-हिंदवाडी) हा दुचाकीस्वार मोटारसायकलवरून आपल्या घरी जात होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराचे वळणावर नियंत्रण सुटले आणि त्याने निखिल चालवीत असलेल्या दुचाकीला जोराची ठोकर दिली. या ठोकरीने निखिल गंभीर जखमी झाला. काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखीलची प्राणज्योत मालवली.
भरधाव वाहन चालविणाऱ्या दुचाकीच्या मागील आसनावर बसलेला वडगाव सोनार गल्ली येथील वेर्णेकर नामक युवक दुचाकीवरून फेकला गेल्याने जखमी झाला तर भरधाव दुचाकी चालविणारा युवक किरकोळ जखमी झाला. रंगरेज असे या युवकाचे नाव असल्याचे बघ्यातील एकाकडून बोलले जात होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article