राणी चन्नम्मा उत्सवानिमित्त काकती येथे हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ : सेंट जॉन्स काकती विरुद्ध जीएसएच काकती यांच्यात झाला हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटनपर सामना

Ravindra Jadhav
राणी चन्नम्मा उत्सवानिमित्त काकती येथे हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ : सेंट जॉन्स काकती विरुद्ध जीएसएच काकती यांच्यात झाला हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटनपर सामना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : वीर राणी चन्नम्मा उत्सवानिमित्त काकती येथील मराठी शाळेच्या मैदानावर काकती विभागीय मुला- मुलींच्या हॉलीबॉल आणि थ्रोबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
सदर स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला आहे.

बेळगाव ग्रामीण तालुका पीईओ श्रीमती साधना बद्री, सीआरपी नीता यलजी, मुख्याध्यापक बी. एन. मळवाड, मुख्याध्यापक किरण करंबळकर, क्रीडाशिक्षक महेश अक्की, अशोक खोत, सी. एम. पाटील, बी. वाय. हित्तरगौड, विजय राजमणी, ए. बी. अरवळे, शिवानंद तल्लूर, क्रीडा शिक्षक सुनील देसाई,ए. एन. नाथबुवा या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

सेंट जॉन्स काकती विरुद्ध जीएसएच काकती यांच्यात सतरा वर्षाखालील मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटनपर सामना झाला. पीईओ साधना बद्री यांनी नाणेफेक करून स्पर्धेला चालना दिली. यावेळी शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article