‘ फेस्त ऑफ किंग ‘ निमित्त ख्रिस्ती बांधवांनी काढली मिरवणूक : 1500 हून अधिक लोक झाले होते मिरवणुकीत सहभागी

Ravindra Jadhav
‘ फेस्त ऑफ किंग ‘ निमित्त ख्रिस्ती बांधवांनी काढली मिरवणूक : 1500 हून अधिक लोक झाले होते मिरवणुकीत सहभागी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : ‘ फेस्त ऑफ किंग ‘ सणाच्या निमित्ताने बेळगाव शहरातील ख्रिश्चन समुदायातर्फे धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती.
कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सेंट जोसेफ कॉन्व्हेंट रोड, ग्लोब थिएटर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड, वनिता विद्यालय मार्गे मार्गक्रमण करत सेंट झेवियर्स हायस्कूल परिसरातील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च आवारामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकी दरम्यान या सर्वांकडून प्रार्थना व भक्ती गीतांच्या माध्यमातून भगवान येशू ख्रिस्ताची स्तुती केली गेली.
बेळगाव विभागाचे बिशप रेव्हरंट डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू, नन्स आणि नागरिक असे सुमारे 1500 लोक सहभागी झाले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article