Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि चिकुनगुणिया प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली.
भाजप युवा नेते किरण जाधव, उज्वला बडवण्णाचे, प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर, सविता करडी, शिल्पा केकरे, राजन जाधव यासह अमृता कारेकर, आरती पाटोळे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
बेळगाव शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाची लागण सुरू आहे. याची काळजी घ्यावी आणि आरोग्य अबाधित ठेवावे असे सांगतानाच प्रत्येकाने आपापला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन यावेळी बोलताना किरण जाधव यांनी केले.
बेळगाव उत्तर विभागात प्रत्येक भागात आजपासून डेंग्यू-चिकुन गुणिया आणि मलेरिया प्रतिबंधक लस पाजण्याच्या उपक्रमाला चालना देण्यात येत असल्याची घोषणाही यावेळी किरण जाधव यांनी केली. शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन मंडळाने शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
बुथस्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने हा उपक्रम पार पाडण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TAGGED:
Share This Article