पर्यावरण दिनी किरण जाधव यांनी दिला ‘ झाडे लावा, झाडे जगवा ‘ चा संदेश

Ravindra Jadhav
पर्यावरण दिनी किरण जाधव यांनी दिला ‘ झाडे लावा, झाडे जगवा ‘ चा संदेश
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजप नेते आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी परिसरात वृक्षारोपण करून ‘ झाडे लावा, झाडे जगवा ‘ चा संदेश दिला.

जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून ते जगावावे. पर्यावरण ढासळत चालले असून समतोल राखण्यासाठी संघ-संस्थानी किमान आपापल्या भागात झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करावे. शाळा-महाविद्यालयातूनही वनमहोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला करावा, असा संदेश किरण जाधव यांनी यावेळी दिला.
किरण जाधव यांनी यावेळी वृक्षारोपण करून रोपट्याला पाणी देत पर्यावरण दिन साजरा केला.

याप्रसंगी लक्ष्मण पवार, वनखात्याचे चैतन्य कुलकर्णी, वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच विमल फौंडेशनचे चेतन नंदगडकर, अभिषेक वेरणेकर यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article