बेळगाव : मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्या 2024-25 सालासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी संभाजी पिराजी कणबरकर व उपाध्यक्षपदी सूर्यकांत भरमाणी मरुचे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संतोष जैनोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
कार्यवाहपदी केतन चौगुले, खजिनदारपदी सुशील धामणेकर तर हिशोब तपासणीसपदी पुंडलिक कणबर्गी, शिवराज लाड यांची निवड करण्यात आली.