भारत विकास परिषदेतर्फे 25 रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 19 : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवार दि. 25 रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात, हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भारत विकास परिषदे केले आहे.

स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 12 वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. समूहात कमीतकमी 6 आणि जास्तीतजास्त 8 विद्यार्थी असावेत. वाद्य संगतीकरिता अधिक 3 सहकाऱ्यांना मुभा असेल. विद्युत संचलित वाद्यांना स्पर्धेत परवानगी नाही. समूहगायनासाठी अधिकतम 7 मिनिटांचा कालावधी असेल.

परिषदेतर्फे प्रकाशित ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातीलच हिंदी गीत असले पाहिजे. लोकगीत कोणतेही चालेल. संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे. संगीतरचना, शब्दोच्चार, स्वर, ताल आणि एकूण प्रभाव अशी गुणांची विभागणी असेल.
प्रथम क्रमांक प्राप्त शाळासमूहाला प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. प्रांतविजेता दक्षिण भारत विभागीय स्तर आणि विभागीय स्तर विजेता राष्ट्रीय पातळीवर समूह गायन स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करेल.

अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजिका रजनी गुर्जर, 9743441828 अथवा योगिता हिरेमठ 9934448288 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे भाविपचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article