खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतले शनी महाराजांचे दर्शन : परिसरातील लोकांकडून ऐकून घेतल्या नागरी समस्या

Ravindra Jadhav
खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतले शनी महाराजांचे दर्शन : परिसरातील लोकांकडून ऐकून घेतल्या नागरी समस्या
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शनिमंदिर, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील लोकांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या.

पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्याआधी खासदार शेट्टर यांनी शनिमंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेतले. पूजा-आरती झाल्यानंतर ‘ जनहित साधण्याची शक्ती दे, सर्वांवर कृपादृष्टी ठेव, अशी प्रार्थना शनिदेवाकडे केली. यावेळी अध्यापक परिवाराकडून शाल, श्रीफळ देवून जगदीश शेट्टर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी परिसरातील मान्यवर अनिल चौधरी, श्रीकांत कदम, गजानन पाटील, शिवराज पाटील यांनी या भागातील नागरी समस्या तसेच खराब झालेल्या उड्डाण पुलामुळे वाहनचालकांना होणारा त्रास कथन केला. या उड्डाण पुलाखाली लहान लहान दुकाने बांधून पुलाखालील जागेचा सदुपयोग करावा, अशी मागणीही यावेळी खासदारांकडे करण्यात आली.
यानंतर खासदार शेट्टर यांनी, शनी मंदिर ट्रस्टच्या नव्या वास्तूच्या बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच या बांधकामासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली. युवा नेते आणि भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे किरण जाधव यासह पंचमंडळी, परिसरातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article