खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना आयोजित शिबिराचा लाभ घेतला 430 हून अधिक जणांनी

Ravindra Jadhav
खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना आयोजित शिबिराचा लाभ घेतला 430 हून अधिक जणांनी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्यावतीने आणि सरकारी इस्पितळ खानापूर आणि जिल्हा इस्पितळ बेळगाव यांच्या सहकार्याने श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबीर आयोजिण्यात आले होते.


कणकुंबी आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत कणकुंबी,पारवाड, आमटे व गोल्याळी तसेच कणकुंबी पंचक्रोशीतील संघ संस्था पंचमंडळ ग्रामस्थ व देणगीदार श्री माऊली मंदिर कणकुंबी व्यवस्थापक मंडळ यांच्या सहकाऱ्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरामध्ये डोळे तपासणी, मोफत चष्मे वितरण, दंत चिकित्सा, रक्तदाब, रक्तशर्करा (बीपी, शुगर ) तपासणी,
स्त्रियांचे आजार व इतर सर्व आजारावर तपासणी करून मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम लक्ष्मण गावडे (कणकुंबी ) हे होते. व्यासपीठावर व्ही एम बनोशी (तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष), डॉ. महेश किवडसनवर (आरोग्य अधिकारी), विश्वनाथ डिचोलकर (श्री हनुमान सोसायटी ओलमनी), विलास बेळगावकर (जांबोटी सोसायटी अध्यक्ष), डॉ. बंडोपंत पाटील (कणकुंबी), स्वागताध्यक्ष तसेच अरुण नाईक, कृष्णा गावडे, डी एम भोसले (ज्येष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष) उपस्थित होते.
प्रारंभी कणकुंबी माऊली हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी ईश्वस्तवन व स्वागत गीत म्हटले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सी एस पवार (जनरल सेक्रेटरी) यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार एम जी बेनकटी (श्री विठ्ठल वेताळ संघटनेचे संयोजक) यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल डी पाटील (ऑर्गनाइज सेक्रेटरी) यांनी केले.
90 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणाऱ्या शिवाजी नागेश दळवी व लखनशेठ वाडेकर (कणकुंबी) यांचा जीवन गौरव म्हणून सर्व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉक्टर महेश किवडसन्नवर, डॉक्टर बंडोपंत पाटील व विलास बेळगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन उमाकांत वाघधरे यांनी केले.

या शिबिरामध्ये 139 जणांना चष्मे मोफत देण्यात आले. 80 पेक्षा अधिक लोकांचे आयुष्मान भारत कार्ड बनविण्यात आले. 40 पेक्षा अधिक जणांची दंत तपासणी करून उपचार करण्यात आले. 30 पेक्षा अधिक लोकांची टीबी तपासणी करण्यात आली. 200 पेक्षा अधिक लोकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. 30 पेक्षा अधिक स्त्रियांची तपासणी करून मार्गदर्शन व औषधोपचार देण्यात आले. एकूण 430 पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी श्री माऊली मंदिर विश्वस्त कमिटी यांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी सभागृह भोजनगृह आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
विभाग निरीक्षक पांडुरंग डिचोलकर, महादेव साबळे, मल्लू चव्हाण, सावंत सर, जयसिंग पाटील, जिगजीनी, निलजगी, प्रकाश काद्रोळी, व्ही एन पाटील, महादेव पाटील, कुट्रे, रामा डवरी, श्रीमती संजना कोरवी, श्रीमती सोनाली गावडे, श्रीमती प्रभावती चोर्लेकर, शिवाजी कावळे, एस एच गुरव, संजू चव्हाण, सुनील चिकुळकर यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article